Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image

Monday, March 21, 2011

All in one

प्रेमात पडलं की सारेच जण

कविता करायला लागतात

खरं सांगायचं तर थोडसं

वेड्यासारखंच वागतात

यात काही चुकीचं नाही

सहाजिकच असतं सारं

एकदा प्रेमात पडलं की

उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग

कागदावरती उतरतात

डोळ्यांमधील आसवंसुद्धा

शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार

आपल्याला मग छ्ळू लागतात

न उमजलेल्या बरयाच गोष्टी

तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही

एकाकी रात्री खायला उठतात

ओठांपाशी थांबलेले शब्द

कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग

रात्र रात्र जागतात

प्रेमात पडलं की सारेच जण

कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही

प्रेमात निरनिराळे अर्थ असतात

गणित, भूगोल, व्याकरण सारी

इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली

तरी इस्त्रीचा शर्ट घालतात

जग जिंकल्याच्या तोरयात

छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय

कशाचच नसतं भान

चालता बोलता तिचाच विचार

'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे

एकदाही आपण गेलेलो नसतो

तरी तिच्यासाठी चंद्र-तारे

तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे

असं हजारदा सांगतात

प्रेमात पडलं की सारेच जण

कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला

तरी खूप आधार वाटतो

ती समोर नसल्यावर मात्र

खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही

अशा वेळी फार हळवी होतात

खरं सांगतो रात्र रात्र

अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील

चांगला माणूस बाहेर पडतो

हळवा होऊन दुसरयासाठी

एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने

सारीच आपण बाजूला सारतो

दुसरयासाठी आनंदाने झुरतो

जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही

फक्त एकच गोष्ट मागतात

प्रेमात पडलं की सारेच जण

कविता करायला लागतात

--------------------------------------------------------------------------------------------------

पेटलं तेच रक्त.......शिवबांचे

धडधडणाऱ्या छातीच अन

मराठ्यांच्य जातीच

धारधार पतीच अन

स्वराज्याच्या मातीच

कितीही आल्या दिल्लीतून स्वाऱ्या

तरीही मनगटात बाल आहे वाघच

अरे मराठा आहे मराठा म्हणाव

मोडेल पण वाकणार नाही तेच रक्त मराठयांच

केली कुणी नजर वाकडी कि

पित्त खवळत मराठ मोळ्याच

घेतलीच परीक्षा विषाची तर

इथ बोलत पात फक्त तलवारीच

मराठा सिंह गर्जत यावा

ऐस वचन प्रभावी रायाच

छाती ठोकून सांगतो महाराष्ट्र माझा

भय कुणाच्या बा च

काळी माती निडर माणसं

दिमाखात फेट उभ तुर्र्रर्यय्य्य्याच

घालवला अफजल अजमल इथ जेरबंद

कीर्ती अमर बाजीची तसं बलिदान सार्थ ओंबाळेनच

फितूर सापडता ठेचा नाहीतर

पुन्हा पानिपंत व्हायचं ऐसा बाळगा इमान उराशी गाड्याहो

शिथिल न पडावं क्षणभरही

फाडकन त्या भगव्याचं

----------------------------------------------------------------------------------------------------------

मुली

समजुन सगळे

नासमज बनतात मुली,

चांगल्या चांगल्या मुलांना

वेडयात काढतात या मुली.

अनोळखी पुरूषाला

दादा - भैय्या म्हणतात मुली,

पण आपल्याच ओळखीच्यांना

ओळख दाखवत नाहीत या मुली?

बोलायला गेलो तर

लाइन मारतोय म्हणतात मुली,

मग नाहीच बोललो की

Attitude दाखवतोय असे म्हणतात या मुली?

मुद्याचं बोलणं थोडंच असतं

तरी चिव चिव चिव चिव खुप करतात मुली,

जेव्हा खरंच बोलण्याची गरज असते.

तेव्हा नजर खाली करुन रुमाल का खराब करतात या मुली

पाऊसात भिजायचं तर असतं

तरी चिखल पाहुन नाक मुरडतात मुली,

थंडी गुलाबीच चांगली असते म्हणतात

मग २-४ स्वेटर घालुन सुद्दा कुडकुडत अशा या मुली?

वाचुन ही कविता

चांगल्याच भडकतील या मुली

मग (कदाचित) विचार करुन मनात

थोडं तरी बरोबर आहे म्हणतील याच मुली..........

finally किती complicated असतात या मुली

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रेम करून काय मिळवलं

जवळ होत तेही गमावलं

किती दिवस वाया गेले

त्यात थोडे दुखही कमवले

दूर तू निघून गेलीस,हृदय हे धडधडले

तू परत येशील असे मन सांगत राहिले

त्याचेहि म्हणणे ऐकून घेतले

प्रेम करून काय मिळवले

आतले हृदय कुठेतरी जखमी झाले

हे मात्र काही काळाने जाणले

नंतर सर्व विसरायचे ठरले

प्रेम करून काय मिळवले

नव्या वाटेवर मन वळले

प्रेमाचे शब्द हवेतच विरले

कामात मन हे रमले

प्रेम करून काय मिळवले

तुझ्या बापाने तुला कोणासोबत तळ्यावर पहिले

नंतर समजले घरी नेऊन तुला खूप धोपटले

मला हे ऐकून हसू आले आणि दुखही झाले

कारण आजही तुझ्यावर प्रेम करतो आणि तेव्हाही केले

प्रेम करून काय मिळवले

तुझ्या यादीत प्रेमवीरांची नवे वाढतच गेली

त्याची रंगातही वाढतच गेली

माझी अवस्था मात्र कर्णासारखी झाली

याची जाणीव तुला कधीच झाली नाही

पुन्हा प्रेम करायचे नाही असे ठरले

प्रेमात पाडायचे पण पडायचे नाही असे ठरले

एकानंतर दुसरी असे कित्येकांना केले

मी मात्र असे न करण्याचे ठरवले

प्रेम करून मी फक्त एवढेच मिळवले

----------------------------------------------------------------------------------------------------------------

अंधार होत

चाललाय

दिवा पाहिजे ।

या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे

नेते झाले अफ़जलखान

स्वातंत्र्याचे तुळजापूर

झाले ।

या जुलमी शायिस्तेखानची बोटे

तोडण्यास एक युवा पाहिजे।

या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे

असे कसे झाले

यौवना मराठ्यांचे भक्त ।

मराठ्यांच्याच तलवारीवर

मराठ्यांचेच रक्त ।

पुन्हा एकदा हर हर

महादेवची वादळी 'हवा'

पाहिजे ।

या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे

आणि या महाराष्ट्राला " राज

साहेबानासारखा युवा पाहिजे

---------------------------------------------------------------------------------------------------------------

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

कसे पुसायाचे राहून गेले..

लपविलेले दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

.

.

सांगितले बरेच काही..

आनंदाश्रु अन काही बाही..

अर्थ सुकल्या आसवाचा परी

लावायचा तो लावून गेले..

.

लपविलेले जे दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे

चाचपले कितिक मुखवटे

मुखवट्याला चेहर्यावरती

चढवायाचे आज राहून गेले

.

लपविलेले जे दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे

वावरते जणू.. उनाड वारे

हसताना पुन्हा भरले डोळे

पापणीतून अश्रु वाहून गेले

.

लपविलेले जे दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

.

.

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

कसे पुसायाचे राहून गेले..

लपविलेले दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,

जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!

भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,

वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,

तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!

तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,

लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!

"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",

"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."

ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,

टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"

बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,

स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!

कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,

त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!

अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?

लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

मनात विचारांचे वादळ उठले होते काय ते हिला विचारावे

तोंडामध्ये त्राण आणून पुकारले तिचे नाव

तिनेही मागे बघून लगेच जाणला माझा भाव

विचारले तिला वाटते का माझ्याविषयी तुला काही

"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"

स्वप्न होते, सत्य नाही

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

तुला College मध्ये पाहताच वेडा झालो तुझ्यामागे

तुला College मध्ये पाहताच

वेडा झालो तुझ्यामागे

मित्रांकडून Setting लावली

फ़क्त तुझ्यासाठी...

तेव्हापासून वेळेच भान ठेवले

कोणते Subjects केव्हा

College ला येत होतो वेळेवर

फ़क्त तुझ्यासाठी...

कसले ते Friends

आणि कसले ते जग

सगळ्याना विसरलो मी

फ़क्त तुझ्यासाठी...

तुझ्याशी ते आपले प्रेमळ गप्पे

Customer Care ला फ़ोनकरून

कमी केले Call Rates

फ़क्त तुझ्यासाठी...

आरश्यात स्वताहाला बघू लागलो

मस्त रैप चिक Style मध्ये

फाटलेली Jeans पुन्हा शिवली

फ़क्त तुझ्यासाथी...

Datiing, Cinema, Garden

मस्ते पैकी आपले ते फिरने

मित्रांकडून छोटा Loan घेतला

फ़क्त तुझ्यासाठी...

Pocket Money चे पैसे वाचवले

एक NOSE RING घेतली

माझा हा Birthday Gift

फ़क्त तुझ्यासाठी...

तुझ्यासाठी माझे हे रात्र-दिवस

घरी उशिरा पोहचताच

आई-बाबांशी खोट बोललो

फ़क्त तुझ्यासाठी...

तुझ्यावर मी खुप प्रेम करतो

किती करतो हे कस सांगू

तुझ्यासाठी नेहाला Ditch केले

फ़क्त तुझ्यासाठी...

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवजयंती विशेष

महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा मराठी मनाचा महाराष्ट्र

भक्तीच्या ऐलतीराच्या शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र

मातीत दुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास

उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र ,पोलादी छातडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र

गरजा महाराष्ट्र माझा म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत

ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावनाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र

पण हाच महाराष्ट्र पहुडला होता निश्चित निपचित ग्लानी आल्यासारखा

नव्हता शिवधर्माचा अभिमान कि नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान

कच्दील यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता मातीला वीट आला होता

ह्याच माती मध्ये आईसाहेब जिजाऊ बागडल्या

इथेच शहाजी राजे रमले अन हीच स्वातंत्र्याची ठिणगी शिवनेरीवर गेली

अन शिवनेरीवर एका दिव्याच्या रुपात प्रकटली आणि हाच दिवा पुढे सह्याद्रीचा

छावा झाला

अन काही काळातच

हे राज्य व्हावे हि श्रींची इच्छा दोडू लागली मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागली

अन साडेसातशे वर्षानंतर ह्या महाराष्ट्रातले माणूसबळ एकवटले जावून तळहातावर

गर्दन पेलून ठामपणे उभे राहिले अन रायगडावरती ३२मन सोनेरी सिव्हासन स्थापन झाले

सकळपणमंडित अखंड लक्ष्मीअलंकृत राजकार दुरंदर श्रीमन महाराज राजाधिराज

छत्रपती शिवाजी महाराज कि जय हि किलकारी रायगडाच्या कनाकनाला मराठ्यांच्या मनामनाला

अन काळाच्या क्षण क्षणाला भेदून गेली

राजांचा महिमा इतका कि आजहि इथे जन्मलेल्या आजही इथे जन्मलेल्या मुलाला सांगाव

लागत नाही शिवाजी महाराज कोण होते ते जन्मताच इथली माती त्याच्या भाळावर जणू

शिव छत्रपती हे नाव कोरूनच ठेवते अन मग छत्रपती शिवाजी महाराजकी हे नाव ऐकायच्या आधी

त्याच्या ओठातून जय कधी बाहेर पडते हे त्यालाच समजत नाही

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो!

मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो!

चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही,

सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो?

मी अता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे...

जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो!

का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो?

मी तुम्हासाठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो!

आज कैशी आपुली ही भेट ताटातूट झाली?

भेटतांना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो?

मी चुका केल्या तरीही काय हे नाही परेसे?

मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो!

जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला-

मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

ते गोड क्षण,

माझं हळवं मन;

तुझी अखंड बडबड,

आणि माझं नि:शब्द मौन.

तू कसं विसरु शकतेस?

तूझं मुग्धपणे हसणं,

हसताना मोहक दिसणं;

तुला डोळ्यात साठवताना,

माझं भान हरपणं.

तू कसं विसरु शकतेस?

तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,

घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;

तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,

माझं तुझी समजुत काढणं.

तू कसं विसरु शकतेस?

आपलं ते चांदण्यांखाली जागणं,

तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;

जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,

तुझा हात माझ्या हातात गुंफणं.

तू कसं विसरु शकतेस?

माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,

तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;

तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,

माझं रात्र रात्र जागणं.

तू कसं विसरु शकतेस?

तू कसं विसरु शकतेस;

माझं प्रेम,

माझ्या भावना,

माझं मन,

माझ्या वेदना.

सांग, तू विसरु शकशिल का?

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली

सकाळी सकाळी गेलो म्या बस थांब्या वरती

सुंदर सुंदर पोरयाईची असते जिथे भरती

इकत घेतला होता गुलाब लाल चुटूक छान

मिथुन वानि दिसत व्हतं म्हाय एकूण ध्यान

लाल प्याटं हिरवा शर्ट गॉगल व्हता लावला

मले होता व्हॅलेंटाईन डे चा कीडा चावला

जाउन उभा राहिलो म्या जवळ एका पोरीच्या

सुंदर अश्या दिसणार्या त्या बघा गोरीच्या

दिलाची हो माझ्या अशी वाढली होती धक धक

बघत होतो तिच्या कडे सारखा म्या टक मक

पोरी बघून बाकी म्हाइ टर होत्या उडवत

बघतोय बघ तुलेच बोलून तिला होत्या चिडवत

म्हन्ल एवढी सुंदर हाय पटली तर नसल

बघुया चान्स मारून नेमच तर चुकल

कसा तरी आव आनुन म्हनलं तिले हल्लो

हाय तिने म्हणताच म्या उभ्या उभ्या मेलो

गुलाब देऊन म्हन्ल खूप प्रेम करीन तुझ्यावर

दिवस आज हाय प्रेमाचा नको नेऊस उदयावर

तिनं बी मग कबूल हाय म्हन्लं थोड लाजुन

इस्वास नाही बसत मले खरं सांगतो आजुन

मना सारखी म्हाया म्या पोरगी बघा गटवली

अन व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली !!!!!!!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

ती माझ्याकड़े बघते

मी तिच्याकडे बघतो

पण बोलणे होतच नाही

बोलायला उशीर होतोय का ?

काल सुद्धा तिने मला खूप वेळा पाहिले

माझेच लक्षच नव्हते

म्हणुन मला नाही कलले

बघायला सुद्धा आता उशीर होतोय का ?

माझी नजर गर्दीतून तिलाच शोधत असते

तिची नजरही कोपरयात वाट पाहत असते

नजर मिलाल्यानंतर ती गोड असते

मला हसायला उशीर होतोय का ?

ती का बोलायला येत नाही

याचा विचार मी करतो

आणि समोर आली की सगल्याचाच विसर पडतो

माझ्या विसरन्याला उशीर होतोय का ?

दिवसामागून दिवस जात आहेत

आमचे नुसते असेच चालू आहे

कधी कोणी तरी पुढे येणार का ?

अजुन होणारा उशीर थाम्बवनार का ??

आत्ता सुद्धा मला उशीर होतोय

इतके दिवस तिला पाहतोय

तिच्या सौंदर्याला शब्दात उतरवायला

उशीर होतोय का ?????????

------------------------------------------------------------------------------------------------------------------

आत्ताच डोळ्यात गळून गेली

जी आठवांना विसरून गेली.

होते अश्रू नीकट काळजाच्या

डोळ्यात सारे भिजवून गेली.

मी जागुन आयुष्य काढलेले

ही रात्र झोपेत गिळून गेली.

होतो मि तीथेच समोर तीच्या

ती मान मागे वळवून गेली.

हा दोष मी आज कुणास द्यावा

दोषी मला ती ठरवून गेली.

शब्दास आता रडु आवरेना

काव्यास माझ्या रडवून गेली.

झालो मि आता निवडूंग वेडा

तीही गुलाबात दगूंन गेली.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन

शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस

आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस

काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..

अंबराची शाल निळी अंगावर ओढून

निळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस

श्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस

काय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस

निराश मनाला, पुन्हा उभारी,

हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस

बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस

काय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस !!!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कविता करायला का शिकलो?

कारण आयुष्यात, नेहमीच मी फसलो

कधी प्रवासाची वाटंच चुकलो

मग तिथेच थांबून, खूप रडलो

कधी एका दुःखातून, कसातरी सावरलो

लगेच दुसर्या दुःखात मी अडकलो

उगाच वाटे, मी यातून निसटलो

क्षणात लक्षात येई, ईथे मी चुकलो

बर्याच्वेळा आयुष्यात, मी ठेचकाळुन पडलो

दरवेळेस मी तेव्हा, नव्या जोमाने उठलो

माझ्याच चुकांमुळे, आपले गमावून बसलो

शेवटी या निरस आयुष्यावर, खुप-खुप हसलो

हसुनसुद्धा सारखं, मी फार थकलो

म्हणून चुकून मी, कविता करायला शिकलो.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आमची बी संपी आता कालेजात जाते,

आन् पोरीचा नखरा पाहून मायच खुश होते !

कट्यावरचे पोर आता वर्गात यीऊ लागले ,

संपीले पाहन्यासाठी मास्तर बी तास घेऊ लागले !

अश्या आमच्या संपीले एकदा बाब्या भेटला ,

"तुहयासंग लगीन करायच हाये मले" म्हटला .

संपी म्हटली बाब्याले " थोबाड बघ आरश्यात " ,

"तुहयासारखे छप्पन पोर हायेत आजुन कालेजात " !

संपी माग फिरून फिरून बाब्या त्याच वर्गात ,

आन् बाब्याले नादी लावून संपी पुढच्या वर्गात !'

अशी आमची संपी आता मस्तरीन झालीया ,

आन् त्याच कालेजात बाब्याले विंग्रजी शिकवतीया !!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तुझ्या मैत्रीवर कितीही

लिहीलंतरी उनं वाटतं

माझ्याकडे आज कुठंतरी

काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षणपुन्हा हवेहवेसे वाटु लागतात

आज मन माझं लख्ख आकाश त्यात

तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावलीअशी

आयुष्यावर दाटली होती

आयुष्यातली उन्हं माझ्या

तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी

मी आजही जपुन ठेवतो

आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन

काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ माझ्याशी

आजन्म असचं राहील

तुला ठेच लागली कधीतर

पापणी माझीच वाहील

मन माझे वेडे पुन्हा एकदा

त्या क्षणांचा शोध घेतात

अन शब्द माझे कवितेतुन

तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नदी नि शेतं नि वार्याची गिरकी

ढगाची विजेने घेतलेली फिरकी

वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं

"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र"

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तुझं माझ्या आसपास वास्तव्य असलं

की माझं अस्तित्व

तुझ्या असण्यात विरघळू लागतं..

तो वेळ मी तसाच साठवत राहतो

माझे शब्द, माझं बोलणं

तुझ्या हसण्यात हरवू लागतं..

तुझी लगबग, सावरासावर सारं टिपत राहतो

माझं स्वत:चं असल्यागत..

पण दोघांमधलं काही श्वासांचं हे अंतर

ओलांडायचं धाडस होत नाही

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अगं जरा थांब ना.

अशी हात झटकून जावू नकोस

एकटा उभा बघ मी अंधारात

ठेव ना..सोबत दिवा नेवू नकोस

चोहिकडे अंधार दाटलेला

वटवागुळांची किरकिर..

बघ सारे बोचकारतात मला

तुला नाही का माझी फिकिर

ये ना परत अशी..

हातात दिवा घेवून ये

बघ मी उभा अजुन अंधारातच

थोडा तरी प्रकाश दे..

हळूहळू दोघे चालत राहू

दिव्याच्या प्रकाशात.

सोबत दे ना मला तुझी

खडतर प्रवासात.

सूर्यकिरणे दिसेपर्यंत

चालत राहू आशेने

धर जरा हात घट्ट

चल सोबत विश्वासाने.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काही वर्षांपूर्वीची गोष्ट पुणे बंगलोर महामार्गावर

नवरा बायको आणि त्यांचा दहा-बारा वर्षांचा मुलगा हिरो-होंडा गाडीवर चालले होते

पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्यात हायवेवर ह्यांची गाडी भयान वेगाने निघाली होती

गाडीचा वेग वाढत होता पावसाची रिप रिप वाढत होती अचानक समोरून एक भरधाव

वेगाने ट्रक आला डोळ्याचे पाते लावते न लवते तोच ह्या ट्रक ने गाडीला धडक दिली क्षणात होत्याचे नव्हते झाले

नवरा ट्रक च्या चाकाखाली आला होता बायको रस्त्याच्या कडेला पडली होती मुलगा कुठतरी लांब जाऊन धडपडला

रस्त्यावर एक विदीर्ण वातावरण पसरले आक्रोश किंकाळ्यांनी मैदान भरून गेल क्षण दोन क्षण काय घडलंय हे कळेना

बायको कशी बशी शुद्धीवर आली नवरा कुठे आहे मुलगा कुठे आहे शोधू लागली इतक्यात तिची नजर ट्रकच्या

चाकाकडे गेली आणि एकांत किंकाळी फोडली काळीज फाडणारे दुख तिच्या उराशी आले होते नवरा चाकाखाली आला होता

मेंदूचापार चेंदामेंदा झाला होता रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता ते काळीजफाडणारे दृश्य तिने बघितले आणि गुढघ्यात डोक घालून ढसाढसा

रडायला लागली ज्याच्या सोबत उभ्या आयुष्याचा संसार केला तो पती माझा गेला पण ज्याच्यासाठी जगायचं तो माझा मुलगा कुठाय

नजर वळवली मुलाकडे गेली मुलगा खड्यातून धडपडून उभा राहत होता आई ठीक आहे बघितले पण बाप आणि त्याक्षणी पोराची नजर वळली ती ट्रककडे

चाकाखालीगेली रक्ताच्या सड्यात पडलेला बाप दिसला आई म्हणून एकांत किंकाळी फोडलीआणि भयान वेगाने ते आईच्या कुशीत शिरले अन ढसढसा रडायला लागले त्यामाउलीने त्या मुलाला घट्ट उराशी पकडले होते पण मुलाच्या तोंडून आवाज काहीबाहेर पडत नव्हता माउलीला जाणीव झाली कि बापाचा

मृत्यू उघड्याडोळ्याने बघितला आणि पोराची वाचा गेली तिला वाटले आज नाही उद्या आपलामुलगा बोलेल परवा बोलेल तेरवा बोलेल महिना सहामहिने वर्षे

अडीच वर्षे उलटली पोरग मुकंच राहिले

एके दिवशी ती आई आपल्या मुलाला घेऊन शाळेच्या स्नेह संमेलनाला गेलीरंगमंचावर एकेक कार्यक्रम सुरु झाला नाटक झाले नाचगाणे झाले

पोरगे किलकिल्या डोळ्यांनी सगळे कार्यक्रम बघत होत इतक्यात रंगमंचावर एका छावणीचे दृश्य दाखवण्यात आले छावणी दिसल्याबरोबर पोरगे

इतिहासात शिरले छावनीचा पडदा उघडला समोर होता आमचा तान्हाजी मागे मावळे होते हरहर महादेव छा गजर करणारे आणि पोराने टन दिशी

उडीमारली काय घडतंय ते बघायला लागले तान्हाजी गरजला होता आधी लगीनकोंढाण्याचे मग रायबाचे आणि जय भवानीची किल्कारी गरजली आणि पोराच्या

लक्षातआले कि ज्या अर्थी तान्हाजी इथे आहे त्या अर्थी शिवाजीहि इथे असणार हातघट्ट झाले मुठी आवळल्या तो पर्यंत शिवाजी येताना दिसले

पोराचा श्वास फुलला रक्त सळसळले आणि एका उचित क्षणी मुलाच्या तोंडून आवाज बाहेर निघाला

आई बघतो शिवाजी

आरे जर अडीच वर्षाचे मुके पोरगे शिवाजी बघितल्यावर बोलत असेल तर तुम्ही आम्ही तर चालती बोलती जिवंत हाडामासाची मराठी बाण्याची माणसे

शिवाजी म्हटल्यावर आपले काय व्हायला paa

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रायगडावर गेले तेव्हा पायथ्याशी

जिजामातेचं मंदिर दिसलं

त्या मातेच्या महान कर्तुत्वापुढे

मस्तक आपसुकच तिच्या चरणाशी झुकलं

तिनेही मग दिला आशीर्वाद तोंडभरून .म्हणाली

समाजात थकलेल्या ,सदा भुकेल्या

लोकांच्या पुढयातलं

समाधानाच्या अन्नाच ताट हो

भरकटलेल्या तरुणाना मार्गावर आणेल

अशीच तू एक वाट हो

अनाथ म्हणुन हीणवल्या गेल्यांची

बनून बघ एकदा आई

आणि त्यातूनच

स्वराज्यानंतरचं सुराज्य साकारू शकेल

असा शिवाजी घडवणारी

तुसुद्धा हो गं जिजाई

तुसुद्धा हो गं जिजाई !

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता संपलयं ते सारं....

आता संपलयं ते सारं....

आता संपलयं ते भास होणे,

तू नसल्याठिकाणी तुला पहाणे,

तू समोर असल्यावर,

स्वतःलाच विसरून जाणे.....

आता संपलयं ते सारं....

आता संपलयं ते तुझे शब्द आठवणे,

तू बोलत असताना माझे गप्प होणे,

आणि,

तुला एकटक बघत रहाणे......

आता संपलयं ते सारं....

आता संपलयं तुझ्यासाठी घरी थापा मारणे,

extra-classच्या नावाखाली तुला भेटणे,

तासनतास बोलत रहाणे,

आणि, फोनचे बिल वाढवणे.....

आता संपलयं ते सारं....

आता संपलीयेत ती भांडणे,

शुल्लक गोष्टीवरून रूसणे,

थोडा वेळ अबोला धरणे,

आणि, नंतर मीच ..

sorry sorry sorry म्हणणे...

आता संपलयं ते सारं....

आता संपलयं एकटे असता तुला आठवणे,

तुला आठवून माझे हळवे होणे,

रात्रभर एकच गाणे ऐकणे,

आणि, कधी,

हळूच अलगद डोळ्यांतुन पाणी ओघळणे,

आता संपलयं ते सारं...

आता संपलयं ते तुझ्यासाठी श्वास घेणे,

तुझ्यासाठी जगणे, आणि,

तुझ्यासाठी तुझ्यावर कवितांवरकविता करणे...

आता संपलयं ते सारं....

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गगनात उडतोय

सा~या पक्ष्यांचा थवा

धरतीवर फिरे

जीव माझा एकला...

आत्मभान हरपले

जीव असा वेडावला

आंगणात मनाच्या

पडतो विचारांचा सडा...

कोणी कोणी ना जवळ

कोणी नाही रे असा

मनी होते हळहळ

समजावू कशी कुणाला...

सारी दूर गेली नाती

सोडून एकले ह्या जीवा

होईल कधी सांजवेळ

परतेल कधी पक्ष्यांचा थवा...

साथ आता केवळ मनाची

मनी आस धरायाची

होईल कधी सुटका जीवाची

घटका केवळ मोजायाची

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' आणि 'प' पासून सुरु करुन येवढा मोठा

परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?

 ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर

कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत

कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये '

कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.

काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे

कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श

किंचाळून कलकलाट केला.

काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श

कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.

कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी'कोलाज'

करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.

काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा

कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.

कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय

काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.

केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या

कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.

कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर

कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या

कागाळीखोर केशवाला काळानेच केला'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!

कथासार

-

क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,

कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या

पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या

पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात

पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्या

पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा

पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी

पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर

पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी

पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी

पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!

पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा

पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा

पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत

पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच

पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्या पुराणांच्या पोपटपंचीमुळे

प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला

पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या

पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.

प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला

पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच

पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी

मनापासुन आवडल होत

खरच तिच्यावर मी

मनापासुन प़ेम केल होत

पहिले आम्हा दोघांमध्ये

फक्त मैत्रीच नात होत

नंतर मात्र तिच वागण बोलण

मला आवडत गेल होत

एके दिवशी सकाळी तिला

माझी बनशील का अस विचारल होत

तिने मात्र उत्तर न

देताच निघण पसंत केल होत

दोन दिवसांनी मात्र तिने

उत्तर नाही अस दिल होत

मैत्रीच नात मात्र पुढे

चालु ठेवीन अस सांगितल होत

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच

गोड विष प्याव लागत होत

विसरता येत नाही म्हणुन

मैत्रीवर समाधान मानाव लागत होत

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत

पण तिला दोष लागेल

म्हणुन तेही जगाव लागत होत

इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत

पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत !!!!!!!!!!!!!!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

किती पाहू वाट तुझी,थकलो मी आता

तुझ्या विना या जगात पकलो मी आता

तुझ्या प्रेमरूपी जाळ्यात फसलो मी आता

तुझ्यावीना आयुष्यात खचलो मी आता

तुझ्यावर मी किती मरतो

फ़क्त तुझ्यावरच प्रेम करतो

तू असताना आयुष्यात माझ्या आनंद सरतो

आयुष्यातला मग प्रतेक क्षण लक्षनिय ठरतो

सांग प्रिये तुझी आता किती वाट पाहू

तुझ्या विरहरूपी पावसात किती नाहू

येतेस की नाही की आता मरणाला जावू

तूच सांग तुझ्यावीना मी कसा राहू

बस आता मी एकच गोष्ट करणार

या दुनियेत मी आता मरणार

आणि माझ्या मरणाला तूच कारणीभुत ठरणार

आणि तू न येण्याचा हट्ट पूर्ण केलास, तरी तूच हरणार .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अस वाटतं तुझ्यावर

रोज कविता करावी

परत वाटतं कशाला

फुकट वही ख़राब करावी

विचार करून लिहिता लिहिता

केस जातील गळून

अणि टक्कल पडल्यावर माझ्याकडे

कोण पाहणार वळून

म्हणूनच आता बंद केलय

तुझ्यावर कविता करणे

आपल्या प्रेमाची बदनामी

का वाचावी जगाने

झाला हा खेळ खुप खुप

झाला

का विनाकारण तमाशा

दाखवायचा जगाला

काही दिवस गेल की

मन माझं वेडावत

आणी दुखं भरया अंतकरणाने

तुझ्यावर पुन्हा कविता लिहायला सुरुवात करत

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लग्नाआधी 'तो' आणि 'ती' लग्नानंतर 'तो' आणि 'ती'

लग्नाआधीचे 'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात, पण लग्नानंतर त्यांच्यातला संवाद बदलतो... कसा?... असा...

लग्नापूवीर्...

तो : हुश्श! किती वाट पाहात होतो मी या क्षणाची.

ती : मी जाऊ का निघून?

तो : छे गं! तसा विचारसुद्धा मनात आणू नकोस.

ती : तुझं प्रेम आहे माझ्यावर?

तो : अर्थातच!

ती : तू कधी माझी फसवणूक तर नाहीस ना केलेली?

तो : नो, नेव्हर! असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो?

ती : तू माझं चुंबन घेशील?

तो : हो तर.

ती : तू मला मारहाण करशील?

तो : अजिबात नाही. मी त्या प्रकारचा पुरुष नाही.

ती : मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का?

तो : हो.

लग्नानंतर...

लग्नानंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी नवा संवाद लिहिण्याची गरज नाही... फक्त हाच संवाद खालून वर वाचत जा!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हसरा चेहरा आणी कपाळावर आठी,

गर्वसे कहो, We Are मराठी,

आमची मुंबई, मराठी मुंबई,

अशी घोषणा देऊन फसलो,

नि आमची मुंबई,

भलत्याच्याच हातात देऊन बसलो

गल्ल्यावरचा मद्रासी अण्णा,

गालातल्या गालात हसतो,

नि मराठी माणूस,

टेबलावरती फडके मारत बसतो...

आमच्या प्रांतात आम्हीच उपरे,

नाही आधार कुणाचा पाठी,

गर्वसे कहो, We Are मराठी,

मराठी माणूस देवाला भितो, कर्जाला भितो,

एवढा दोघांनाही भित नाही,

तेवढे इंग्रजीला भितो.

कुणी 'अरे' म्हटलेकी की तोंडातून 'कारे' निघून जाते,

पण कुणी BASTARD म्हटलं,

की सगळी हवाच निघून जाते

मराठी भाषेला जाऊन एकदा प्रश्न केला,

मुंबईतून गेलीस तशी महाराष्ट्रातून जावे,

असा विचार मनात नाही आला???

त्यावर ती म्हणाली,

काल होती बहिणाबाई आणी मुक्ताबाई,

आज असे कुसूमाग्रज आणी पुं.लं. माझ्या वारी,

थांबले त्यांच्याचसाठी,

गर्वसे कहो, We Are मराठी

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिवसातले चोवीस तास

तासातला प्रत्येक श्वास

आभासातला प्रत्येक भास

अन भासतुनी उरणारे वास्तव

चोहीकडे विखुरलेले वास्तव

पाण्याजवळ असूनही नसल्यासारखा

शहाणा असूनही वेड्यासारखा बसलेला

तू येण्याच्या प्रतीक्षेत शून्यात नजर लावून .

तू येशील मला दिलासा देशील

स्वतःला समजावता समजावता

मलाहि समजावून घेशील

उन्हाळा पावसाळा गेला हिवाळा

तू तुझ्याच नादात तल्लीन

कसा समजेल तुला माझा जिव्हाळा

वादळी वाऱ्यात असूनही वार्याचा स्पर्श न झालेली तू

अन वादळी वार्यात होरपळनारा मी

तुला कधीच कसा कळलो नाही

हातात हात देवून स्वप्न दाखवताना

माझ्या स्वप्नांची वाट लावताना

रुपेरी रस्त्यावर अंथरलेली फुलेही

आता कोमेजून गेली आहेत

जरासा राहिलेला जीवनाचा उन्मेषहि

आता उन्मळून पडण्याच्या मार्गावर आहे

मग कसले आलाय जिनं ?

नुसतं तुझ्या कटू दुखांना पिणं

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

गाईचे वासरावरती असते ते प्रेम

चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम

आईचे मुलांवर असते ते प्रेम

नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम

अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच..

प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,

पण त्याच्या मागील भावना मात्र एकच..

आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते

खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!

तर.

खरे प्रेम असावे..

कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,

त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही.

खरे प्रेम असावे..

गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,

तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही.

खरे प्रेम असावे..

आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..

कुठेही गेले तरी न संपणारे,

सदैव आपल्या बरोबर असणारे..

खरे प्रेम असावे..

पैशाने विकत न घेता येण्यासारखे,

वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे

कारण..

प्रेम हा काही खेळ नाही,

टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी दहशत वादी का ?

मराठी माणसाला रोजगार मिळावा हे मी बोललो , मी दहशतवादी का !

मराठी बोललो,पाटया ही मराठीत लावल्या , मी दहशतवादी का !

शिवरायांचा आदर करतो, मराठी संस्कृति जपतो, मी दहशतवादी का !

महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करतो , मी दहशतवादी का !

मी मराठी जनतेच्या मनातल बोलतो , मी दहशतवादी का !

अन्याय होतो तेथे लात घाला म्हणुन सांगतो , मी दहशतवादी का !

विनंती पत्रक, नोटीसी देतो आणि कायद्याची अम्मल बजवानी करावयास सांगतो,

विरेन शहा सारख्या महाराष्ट्र द्रोहीना विरोध करतो म्हानुम मी दहशतवादी का ?

९ कोटि मराठी जनता व महाराष्ट्रावर प्रेम करतो म्हणुन मी दहशतवादी ?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय

रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय

नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर

छान अक्षरात आपल नाव लिहायचाय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन

नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,

कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या

चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय

सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिलेल का?

हा विचार करत रात्री झोपी जायचय,

अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असु दे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा

दप्तराचं ओझ पाठिवर वागवायचय,

कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऑफ़िसपेक्षा

पन्खे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,

कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा

दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय.......पण.मला शाळेत जयचय्....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी गेल्यानंतर काय हवे

मला हवे ते तुला आज जे हवे हवे.

चिअर्स करूनी रडणारा तो ग्लास हवा

घाटावरती घोटामधला प्राण हवा .!!

मेल्यानंतर हिशोब करणे शक्य असे

जगताना गणिताचे केवळ भय असे

बघतो मी आले गेले कोण कोण ते

मला आता इथे कुणाचे भय नसे.

मेल्यानंतर खोटे खोटे रडले कोण

दिसतील मजला मित्रच माझे.. दुसरे कोण ?

हाय गेला रे. आभ्या आता उडुनी गेला

गुत्त्यामधले पैसे आता देइल कोण ?

मेल्यानंतर माझ्या सौ रडतील आता

आठवण येइल तिला माझी येता जाता

करेल काय पण सांगेल कुणाला

भांडायाला हक्काचा मी निघुन जाता..!!

मेल्यानंतर कळेल मला जगणे सारे

हातामधे येतील माझ्या चंद्र नी तारे

अरे सख्या रे उशीर झाला कळता कळता

बदलून गेल्या दिशाही सगळ्या वळले वारे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एका सावळ्या सायंकाळी

उभा होता तो जवळी,

कुठे तरी टक लावूनी

पाहत होता सांज साऊली

हळूच त्याने पहिले मला

खून करून हसला जरा

आजूनही वाटत काहीतरी

बोलायचे होते त्याला

काय त्याचे रूप होते

सतेज असे लावण्य होते

चंद्रालाही लाजवेल असे

मोहक वाटत होते

पण .........................

पण तो जरा चकना होता

रंग त्याचा सावळा होता

नुसते पंख फडफडणारा

तो एक पारवा होता ...

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

हसतेस एवढी छान की...

हसत रहायला शिकवलेस तू...

बोलतेस एवढी की...

बोलत रहायला शिकवलेस तू....

लाजतेस एवढी छान की...

मला आवडायला लागलीस तू..

जीव एवढा लावलास की..

प्रेम करायला लावलेस तू...

किती प्रेम करतेस तू??

एवढ प्रेम नको ना करूस...

मग काय झाल अचानक??

सोडून का गेलीस तू??

गेलीस तर गेलीस ..

पण तुला विसरु कस??

हे शिकवायला विसरलीस बघ तू!!

ए!! ते शिकवायला तरी परत येशील ना ग तू??..

..........पण यावेळी परत नाही हं जायच,

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शरद पवार म्हणतात ,

"मी बारामतीचा",

विलासराव म्हणतात ,

"मी लातुरचा",

मुंडे म्हणतात,

"मी अम्बाजोगाईचा",

गडकरी म्हणतात,

"मी नागपूरचा",

पण केवल एक आणि एकच नेता

म्हणाला,

"मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माजा"

असे बोलणारा नेता आहे " राज ठाकरे "

" मराठी माणुस "

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी मराठी मी मराठी

म्हटलं तर

का पडली इतरांच्या

कपाळावर आठी?..

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर

मराठी भाषेतली पाटी..

बसायलाच हवी होती अशी

या दादा लोकांवर मराठीपणाची काठी

दूर केलीच पाहीजे ही

त्या लोकांची दमदाटी.

आता फुटली आहे मराठीपणाच्या

सहनशीलतेची पाटी

ही राज नीती खरंच नाही बरं का

मराठी मतांसाठी ..

हा तर खरा आवाज आहे

मराठी अस्तित्वासाठी

बोलतंय कुणीतरी आता

मराठी माणसासाठी

राज तर पुकारतोय लढा

मराठीच्या रक्षणासाठी

पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे

मराठी माणसाची गोची

रोजच्या रोज माणसे येवून येवून

मुंबई भार सहन करेल तरी किती?

मुंबईच काय, ते तर शिरलेत आता

मुळा मुठा नदीच्याही काठी

द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या

गुदमरलेल्या जीवासाठी

त्यासाठी आपण विजयी करायलाच हवी

ही राज नीती .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतो

आणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतो

भावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतो

वेदनांचे वादळ क्षण क्षण झेलत होतो

भरभरून दिले तूच आणि रिक्तही केले तूच

सुख देता देता दुख फक्त दिलेस तू

आश्रुंचे जळ मी माझ्याच ओंजळींनी पीत होतो

तरीही फक्त तुझ्यासाठी सर्व सहन करीत होतो

सुखाची तुझी भाषाच निराळी होती

पण माझ्या सुखाची तार तुझ्याशी जुळली होती

मनाचा कोंडमारा करीत जगासाठी हसत होतो

आणि एकांतात फक्त तुझ्यासाठी रडत होतो

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

~याच दिवसांनी भेटले होते

काय बोलू काही कळत नव्हते

त्याने विचारले किती प्रेम करतेस माझ्यावर..?

नाही रे सांगता येणार शब्द नाही तेवढे पुरेसे

तू संग किती प्रेम करतोस माझ्यावर...

सागराची खोली कमी पडेल

आकाश पालथे घातले तरी

माझे प्रेम पुरून उरेल.

चालल्या होत्या गोष्टी नंतर फार

त्याच्या मनात आला एक विचार

ए सांग ना माझ काही उद्या बर वाईट झाल तर काय करशील.?

तरीही माझ्या वर प्रेम करशील कि मला विसरून जाशील..?

तुला आनंद होईल कि रडत बसशील .?

तिच्या मनात न जाणे काय आले...

थोडी थट्टा करूया म्हणून मनात आले

मी ना मी ना!

खूप आनंदी होईन मला खूप आनद होईल.

सुटका होईल माझी मी सुखी होईन

तो पुढे काही नाही बोलला

त्याने तो विषय तिथेच सोडला

दुसर्या दिवशी ना फोन ना sms आला

फक्त एक निरोप आला

तुझ्या सुखासाठी काहीही...

जाता जाता एवढंच तो म्हणाला.

जाता जाता एवढंच तो म्हणाला.

सांगणे एवढेच कि विचार करावा बोलण्याआधी

नंतर वेळ नाही मिळत चूक सुधारण्यासाठी...

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मला खूप वाटतं कि

तिला पल्सरवरून फिरवावं

शनिवारवाड्याच्या कट्ट्यावर बसाव

पेशव्यांचा वाडा बघून

तिला प्रसन्न वाटाव

माझ्या राणीचा चेहरा

बघून माझाही मन हसावं

मला खूप वाटतं कि

तिला मुव्हीला न्याव

माव्ही बघून रडताना,

माझ्या खांद्यावर तुझे डोक असाव

येताना तिच्याबरोबर

Candle Light Dinner ला जाव

शेवटी घरी सोडताना

शेवटपर्यंत TATA कराव

मला खूप वाटते कि

अशाच कविता करत रहाव

तिच्या सगळ्या आठवणींना

लहान बाळासारख जपाव

ह्या आठवणींनी मन

नेहमीच पुलकित व्हाव

मरेपर्यंत ओठावर

फक्त तिचेच नाव असाव

फक्त तिचेच नाव असाव..................

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

काल तिच्या सोबत चालत होतो...

चालता चालता बोलत होतो...

बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलं नाही...

अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

नविन बुटामुळे पाय दुखत होता...

चालता चालता हाडाला खुपत होता...

तिच्या आनंदात पायाच दुःखण कळलं नाही...

अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

काल खुप खुश होती.......म्हणाली मजा आली

आज का तू थाम्बलास.......माझ्यासाठी....

का थाम्बलो...... तिला काय हे कळलं नाही...?

अजुन

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे

क्षितीजावर लुकलुकणारा एक तर मात्र आठवणीने दे

बेभान कोसळणारा मुक्त पाऊस नाही मागत तुझ्याकडे

श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे

बेदुंध करणाऱ्या रातराणीचा बहार नाही मागत तुझ्याकडे

शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवणीने दे

मुठी एवढे हृदय नाही मागत तुझ्याकडे

माझ्यासाठी चुकलेला ठोका मात्र आठवणीने दे

नाही जास्त कसली अपेक्षा तुझ्याकडून

तुझ्या जीवनात मला महत्वाचे स्थान जरूर दे

नाहीच जमले काही तरी हताश होऊ नकोस

माझ्या पार्थिवाला दावाग्नी आठवणीने दे

आठवणीने दे.........

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तू जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होत

कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पहायचं होत

तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना

माझ्या आठवणींनी तुझ्या डोळ्यात पाणी पहायचे होत

तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पहायचं नव्हत

तर तुझ्या हातावर काढलेल्या मेहंदित माझ नाव शोधायचे होत

तुझ्या हातात भरलेल्या हिरव्या चुडया सोबत

तुझ्या कपाळी माझ्या नावाच कुंकू पहायचे होत

चारचौघात तुला माझी म्हणून मिरवायचे नव्हते

तर महाबळेश्वरच्या त्या गुलाबी थंडीत हि फिरवायचं होत

सगळच जर एकतर्फी असत तर काहीच वाटल नसत

पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कस वाटत नव्हत

काहीच कस वाटत नव्हत ....

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रेमाचा खरा अर्थ

दूरवरच्या माळावर

मला एक वड दिसला होता

माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला

मी त्याला विचारलं

तुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात

तर म्हनाला

मी तर पडलोय प्रेमात

तुझं मला काय माहीत?

मी पुन्हा विचारलं

प्रेम म्हणजे काय असतं

तर म्हणाला

प्रेम हे जगन्याचं भान असतं

पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं

बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं

वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं

अलगद झोळीत पडलेलं दान असतं

मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस

तर म्हणाला

मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय

जिने मला गेल्या पावसात भिजवलं

मी त्याला म्हणालो

अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात

ती तर सगळ्यानांच भिजवते

पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं

अरे मग तर तू मुर्खच

अरे तू स्वताकडे पाहिलयस का?

अर्धा तर जमिनीत रुतलेला

उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा

त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस

तर तो नुसताच गूढ़् हसला

इत्क्यात अंधारुन आले

आकाशात मेघच मेघ जमा झाले

तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता

पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती

त्याच्याशी खेळत होती

या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते

मी खिन्न मनाने

परत निघालो

थोडा दूर गेलो असेल तोच

काडकन आवाज झाला

प्रकाशाचा लोळ उठला

मेघातून निघालेली वीज

धाडकन वडावर कोसळली

मी त्याच्याकडे पाहिले

मरणाच्या दारात असुनही

तो हसत होता

मला म्हणाला

अरे मी तिच्यासोबत घालवलेला

हा क्षण मला पुरेसा आहे

मी समाधानाने प्राण सोडतो आहे

मी मात्र सुन्न झालो होतो

प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हे फक्त माझ्याचसोबत

नेहमी असंच घडणार आहे?

तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट

'ते' न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच

तरी अजून काय ठरणार आहे?

बोलायचं पटकन पण वेडं मन

त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं

निघायची वेळ येणार आहे

पटकन विचारावा प्रश्न हवासा

तर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू काय

हवं ते उत्तर देणार आहे?

हे पुरतं कळतंय तरीही

तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द

तुला वेडीला कळणार आहे?

मी बोललो /न बोललो तरी गप्पच

नेहमीसारखी तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं

सगळंसगळं थांबणार आहे

उष्ट्या कुल्फीची चव मात्र

जिभेवरती रेंगाळणार आहे

स्वप्न माझं हे संपलं तरीही

मनात तूच उरणार आहे

तुझ्यात मी नसलो तरी

माझ्यात तूच सापडणार आहे !

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सरळ सोप्या जीवनात आपल्या

निर्माण झाला हा गुंता का ?

खेळणारा तर वर बसलाय..

मग आपल्या हाती सोंगट्या का

प्राजक्ताच्या नाजूक नात्याला

प्रेमाचे हे कुंपण का

कुरवाळले मी ज्या मनाला

कोमजलेले आज पाहतो का

भरून आलाय मेघ जरी

अबोल माझी घुसमट का

घाव तुझ्यावर घालतो तरी

हृदयी माझ्या यातना का

दूर कुणी वाट पाहतेय

माझ्यासाठी तू थांबलीस का

समजू शकतो तुझे दुख

तू अन मी वेगळे का

शेवटी एवढेच विचारतो

शहाणे होते अंतर अपुले

असेच नेहमी राहील का

निरपेक्ष सुंदर मैत्रीची

साथ नेहमी देशील का

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डोळे माझे शांत आहेत

व्यवहारी जीवनाला फितूर आहे

पण असे समजू नकोस की

ते कधी पाणावलेच नाही

आकाश माझें निरभ्र आहे

चांदण्यांचीही संगत आहे

पण असे समजू नकोस कि ते

कधी ढगाळलेच नाही

काटे माझ्या रस्त्यात आहेत

ती सबंध पसरले आहेत

पण असे समजू नकोस कि

माझ्या आयुष्यात गुलाब कधी

उमललेच नाही

शब्द माझे निशब्द आहेत

झाडासारखे मुके आहेत

पण असे समजू नकोस कि ते

कधी बोललेच नाही

आर्त स्वरांचे गाणे आहे

भूतकाळात मन जात आहे

पण असे समजू नकोस कि

हे सगळं तुझ्यासाठी मनाच कुढन आहे

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देवानी उपकार करून केले आहे माझ्यावर कर्ज

तरी मन करत आहे त्याच्यासमोर अजून अर्ज

त्यातच तुझ्याशी भेटण्याचा मोठा होत उपकार

ग्रहांनी सुद्धा केला याचा सत्कार

पण तू का केल्या आपल्या नात्याचा चित्कार

यातूनच काळाला कसा होतो विरीही दुखाचा आविष्कार

नाही मला तुझ्याशी प्रेम करण्याची इच्छा

असा कधी आला विचार

पण तुला विसरून तरी कसे चालेल

आणि विसरलो तरी हे माझ्या मनाला कसे पटवेल

हीच तुझी प्रीत नेहमी आपल्या हृदयात ठेवेल

प्रेम होते म्हणून करून बघितले

झाल्यावर तुला सांगून बघितले

सर्व प्रकारानंतर थोडे विवळून बघितले

पण तुला स्मरणातून काढणे आजून नाही सातत्यात अवतरले

तुझा विरह मनाला उमजत नाही

म्हणून माझ्या कवितेला दुसरा विषय मिळत नाही

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कुठून तरी येतो मनात

नकळत तुझा विचार

मग स्वतालाच समजू लागतो

मी अगदीच लाचार

तुझ्याच भावविश्वात मी

अगदी गेलो होतो रंगून

आता जाणवले मला सुद्धा

चूक केली तुला देव मानून

आलीसच का अचानक

एकाकी आयुष्यात माझ्या

दिलेस कायमचे दुख असे

ज्याच्या जखमा अजून आहेत ताज्या

आठवात ते सुखद क्षण

तुझी ती गोड मधुर वाणी

पण बोचतात मला ते काट्यांसारखे

आणि डोळ्यात येते चटकन पाणी

सोबत जर द्यायचीच नव्हती

तर शपता घेतल्यासच का

अन इतके सगळे सोसूनही

मी जिवंत का ????

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अभी अभी तो प्यार का PC किया है चालु

अपने दिल के Hard Disk पे और कितनी Files डालु

अपने चेहरे से रूसवाई की Error तो हटाओ

ऐ जानेमन अपने दिल का Password तो बताओ

वो तो हम है जो आप की चाहत दिल मॆं रखते है

वरना आप जैसे कितने Softwares तो बाज़ार में बिकते है

रोज़ रात आप मेरे सपने में आते हो

मेरे प्यार को Mouse बना के उंगलियों पे नचाते हो

तेरे प्यार का Email मेरे दिल को लुभाता है

पर बीच में तेरे बाप का Virus आ जाता है

और करवाओगे हमसे कितना इन्तजार

हमारे दिल की साईट पे कभी Enter तो मारो यार

आपके कई नखरे अपने दिल पे बैंग हो गये

दो PC जुड़ते जुड़ते Hang हो गये

आप जैसो के लिये दिल को Cut किया करते है

वरना बाकी केसेस में तो Copy Paste किया करते हैं

आपक हँसना आप क चलना आप की वो स्टाईल

आपकी अदाओं की हमने Save कर ली है File

--

रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावीअसेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुलायाची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.....

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रेम करताना विचार नाही केला

मला प्रेम मिळेल का

तू होकार देशील का

तू माझी होशील का

माझ्या या निरास जीवनात

नंदनवन फुलेल का

मनापासून....मनावर....

प्रेम करताना कसला

विचार करायचा नसतो

विचार करून कधी

प्रेम करता येत नाही...

मी प्रेम केल...

तुझ्या गोड हसण्यावर

तुझ्या शांत बसण्यावर

तुझ्या मोकळेपणावर

आणि वेगळ्या वाटणाऱ्या स्वभावर

मी प्रेम केले

तुझ्या मंजुळ बोलण्यावर

मासोळी डोळ्यातील बोलाकेपणावर

तुझ्या चेहर्यातील निरागस्तेवर

आणि तेवढ्याच शांत मनावर

मी प्रेम केले

तुझ्या कधी तरी रागावण्यावर

रागाने लाल झालेल्या त्या नाकावर

लटके नाक मुरडन्यावर

आणि गाल फुगवून बसण्यावर

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एकदा ती माझ्याकडे आली

एकदा ती माझ्याकडे आली

माझ्याबरोबर चल म्हणाली

हो म्हणायच्या आतच ती

देऊन हात.घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत

कधी शांत कधी बोलत

पायवाट निळसर नव्हती संपत

नभी चांदणे. चंद्रासंगत

गोड गप्पा नव्हत्या थांबत

सुरेल आवाज जणू कोकिळेगत

मौनामध्ये भासे दीव्य एक रंगत

अनवट सूर बसुरीचा उमलत

हसताना ती बाहुली दिसायची

बारीक डोळे अलगद लाजायची

गालावर खळी नाजूक पडायची

नयन शिंपल्यात .जपावी वाटायची

तरुतळी एका आम्ही बसलो

मनीचे सारे तिला मी वदलो

हात थरथरता तिच्या हातात

परी नजर थेट डोळ्यात

काय झाले पुढे सांगत नाही

स्वप्न सारे पुन्हा आठवायचे नाही

झालो जागा तरी उठलो नाही

करत विचार पडलो मी

प्रेमामध्ये तर पडलो नाही ?

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments: