Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image

Tuesday, May 11, 2010

Ya Muli

मुली
समजुन सगळे
नासमज बनतात मुली,
चांगल्या चांगल्या मुलांना
वेडयात काढतात या मुली.

अनोळखी पुरूषाला
दादा - भैय्या म्हणतात मुली,
पण आपल्याच ओळखीच्यांना
ओळख दाखवत नाहीत या मुली?

बोलायला गेलो तर
लाइन मारतोय म्हणतात मुली,
मग नाहीच बोललो की
Attitude दाखवतोय असे म्हणतात या मुली?

मुद्याचं बोलणं थोडंच असतं
तरी चिव चिव चिव चिव खुप करतात मुली,
जेव्हा खरंच बोलण्याची गरज असते.
तेव्हा नजर खाली करुन रुमाल का खराब करतात या मुली

पाऊसात भिजायचं तर असतं
तरी चिखल पाहुन नाक मुरडतात मुली,
थंडी गुलाबीच चांगली असते म्हणतात
मग २-४ स्वेटर घालुन सुद्दा कुडकुडत अशा या मुली?

वाचुन ही कविता
चांगल्याच भडकतील या मुली
मग (कदाचित) विचार करुन मनात
थोडं तरी बरोबर आहे म्हणतील याच मुली..........
finally किती complicated असतात या मुली
-------------------------------------------------------------

No comments: