Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image

Wednesday, August 18, 2010

अंधार होत

चाललाय

दिवा पाहिजे ।

या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे



नेते झाले अफ़जलखान

स्वातंत्र्याचे तुळजापूर

झाले ।

या जुलमी शायिस्तेखानची बोटे

तोडण्यास एक युवा पाहिजे।

या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे



असे कसे झाले

यौवना मराठ्यांचे भक्त ।

मराठ्यांच्याच तलवारीवर

मराठ्यांचेच रक्त ।

पुन्हा एकदा हर हर

महादेवची वादळी 'हवा'

पाहिजे ।

या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे



आणि या महाराष्ट्राला " राज

साहेबानासारखा युवा पाहिजे

---------------------------------------------------------------------------------------------------------------



थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

कसे पुसायाचे राहून गेले..

लपविलेले दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

.

.

सांगितले बरेच काही..

आनंदाश्रु अन काही बाही..

अर्थ सुकल्या आसवाचा परी

लावायचा तो लावून गेले..

.

लपविलेले जे दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे

चाचपले कितिक मुखवटे

मुखवट्याला चेहर्यावरती

चढवायाचे आज राहून गेले

.

लपविलेले जे दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे

वावरते जणू.. उनाड वारे

हसताना पुन्हा भरले डोळे

पापणीतून अश्रु वाहून गेले

.

लपविलेले जे दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

.

.

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

कसे पुसायाचे राहून गेले..

लपविलेले दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

No comments: